ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

धक्कादायक

पुणे जिल्ह्याात पन्नास हजार करोना रुग्णांचा टप्पा पार

पुणे : मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यााला करोना विषाणूचा विळखा पडला आहे. शहरी भागांबरोबर ग्रामीण भागातही करोना संसर्ग पोहचला असून पुणे जिल्ह्याातील आतापर्यंतच्या करोना रुग्णांची संख््या 51412  इतकी झाली आहे. रविवारी 2459 नव्या रुग्णांची नोंद झाली.
टाळोबंदी शिथील केल्यानंतर शहरांपुरता मर्यादीत असलेला करोना संसर्ग सर्वदूर पसरू लागला आहे. गावांपर्यंत करोनाचे रुग्ण आढळू लागल्याने दररोज करोना रुग्णांची संख््या वाढत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याात रविवारी करोना रुग्णांनी पन्नास हजारांचा टप्पा पार केला आहे. यात पुणे शहरात 35,182, पिंपरी चिंचवड 11,038 तर पुणे ग्रामीणमध्ये 5,192 रुग्ण झाले आहेत. तर आतापर्यंत 1343 जणांचा करोनाने जीव घेतला आहे. त्यात पुणे शहरातील 1008, पिंपरी चिंचवड 220 व ग्रामीणमधील 115 जणांचा मृत्यू झाला आहे. 51,412 आतापर्यंतच्या बाधित रुणांपैकी 32,937 रुग्ण उपचारांअती बरे झाले आहेत. तर सध्या 17,054 रुग्ण उपचार घेत आहेत. 
हे चित्र धक्कादायक आहे. अनेक उपाययोजना करूनही रुग्ण वाढीचा वेग कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाढती रुग्ण संख््या पाहता अजित पवार यांनी आदेश देत गेल्या आठवडयात कडक टाळेबंदीचे आदेश दिले. या टाळेबंदी कालावधीतच रुग्णवाढ मोठी होत आहे. 39835 इतकी असलेली करोनाबाधितांची संख््या 51412 पर्यंत पोहचली आहे. म्हणजे कडक टाळेबंदीत सहा दिवसात 11557 इतकी रुग्णवाढ झाली आहे. 


14 जुलै  
एकूण रुग्ण 1491
मृत्यू : 43

15 जुलै  
एकूण रुग्ण 1510
मृत्यू : 35

16 जुलै  
एकूण रुग्ण 2132

17 जुलै  
एकूण रुग्ण 1904
मृत्यू : 29

18 जुलै  
एकूण रुग्ण 2081
मृत्यू : 39

19 जुलै  
एकूण रुग्ण 2459
मृत्यू : 61

ग्रामीण भागात संसर्ग वाढतोय

आतापर्यंत शहरी भागात असलेला करोना संसर्गाची देवाण-घेवाण गावांपर्यंत पोहचली आहे. ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण या आठवड्यात लक्षणीय वाढले आहेत. रविवारी एका दिवसात 152 रुग्णांची भर पडली आहे. तर नगर पालिका हद्दीत 51 रुग्ण वाढले आहेत. 4493 रुग्ण हे पुणे ग्रामीण व नगरपालिका हद्दीत झाले आहे. 

काळजी केंद्रात गैरसोय

अगोदरच अरोग्य सेवा तोकडी असलेल्या ़ग्रामीण भागात करोना रुग्ण वाढू लागल्याने आता रुग्ण व संशयीतांची मोठी गैरसोय होत आहे. करोना काळजी केंद्रात तालुक्याच्या ठिकाणी अपुरे मनुष््यबळ, अपुरा अरोग्य सुविधा व प्राणवायूची कमतरता याबारोबरच जेवणापासून स्वच्छतेपर्यंत  तक्रारी आहेत. 





Post a Comment

0 Comments