ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

भोरमधील शाळा अंगणवाडी दुरुस्तीसाठी अडीच कोटी


निसर्ग चक्रीवादळाने नुकसान

भोर : नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळचा भोर तालुक्यातील शाळा, अंगणवाडी इमारतींना मोठा फटका बसला होता. यात सुमारे ७०  इमारतींचे नुकसान झाले होते. यासाठी जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे करीत अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाचे आदेश दिल्याचे जिल्हा परिषदेच उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी सांगितले. 
गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने इतर नुकसान कमी झाले असले तरी इमारतींची पडझड मोठ्या प्रमाणात झाली. पुणे जिल्ह्याातील शाळा, अंगणवाडींच्या इमारतींना मोठा फटका बसला होता. पुणे जिल्हा परिषदने या नुकसानीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला होता. याचा पाठपरावा केल्याने यासाठी दहा कोटी 20 लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला आहे. यातून नुकसान झालेल्या शाळा इमारती व अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती करण्याचे नियोजन करीत तत्काळ दुरुस्तीचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. तीन लाखांपर्यंतची कामे ही ग्रामपंचायती स्तरावर केली जाणार असून तीन लाखांच्या वरील कामे ही तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
यात भोर तालुक्यातील ३४ शाळा इमारती व ३४ अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच कोटींचा नधी मिळाला असून ही कामे तत्काळ करण्याचे आदेश बांधकाम उत्तर विभाग जिल्हापरिषद यांनी देण्यात आले आहेत. भोर तालुक्यातील शाळांसाठी सुमारे एक कोटी ८३  लाख तर आंगणवाडींसाठी ३६. २५ लाख निधी मिळाला आहे.  
निसर्ग चक्रीवादळाने शाळा, अंगणवाडी इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. या ठिकाणी विद्यााथ््र्यांची मोठी गैरसोय होणार असल्याने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार दहा कोटींचा निधी मिळाला असून यातून भोर तालुक्यासाठी सर्वाािधक निधी मिळाला आहे. तत्काळ कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
रणजीत शिवतारे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद


दुरुस्ती करण्यात येणाºया शाळा

हिर्डोशी, धानिवली, पोम्बर्डी, वाठार हि.मा, आंबेघर, वडगाव डाळ, उत्रोली, पळसोशी, नीलकंठ, नायगाव, उंबरे, जुननजाई, रांजे, घारपडेवाडी, कोर्ले, जांभूळवाडी, धोंडेवाडी वड.,नाझरे, कारी, घोलपवाडी, नांदगाव, निघुडघर, कारुंगण, कुडली खुर्द, राजीवाडी, आशिंपी, महादेववाडी, धनगरवस्ती  म्हसर, कुंबळे आंबाडे, तळे म्हसवली, आपटी, चिखलगाव.

दुरुस्ती करण्यात येणाºया अंगणवाड्या

कुरुंजी, मिरकुटवाडी, हर्णस, संगमनेर, नºहे, माझगाव, ब्राम्हणघर, वाढाणे, गोरड म्हसवली, करंदी खु, करंदी बु, सांगवी हिमा, येवली, खुलशी, गुहिणी, हिर्डोशी, धामनदेव, गुढे, साळूंगण,  शिळींब, पसुरे, काळेवाडी, विरवाडी, तांभाड, दापकेघर, शिरवली हिमा, सांगवी खु, सावरदरे, सारोळा, सारोळा, किकवी, हातनोशी, वडगाव डाळ. 

  

Post a Comment

0 Comments