ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

वेल्हातील घराघरांत तपासणी

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडुन उपाययोजना

प्रांतधिकारी राजेंद्र जाधव यांच्या उपस्थित आढावा बैठक

मीनल कांबळे  

वेल्हे : पुणे जिल्ह्याातील ग्रामीण भागातही करोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला उपायायोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर वेल्हे तालुक्यातील प्रत्येक घरातील व्यक्तीची तपासणी केली जाणार असल्याची माहीती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहीती देताना तहसिलदार शिवाजी शिंदे म्हणाले की, वेल्हे तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी तहसिल कार्यालय वेल्हे येथे प्रांतधिकारी राजेंद्र जाधव यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात समिती स्थापन करण्यात आली असून या ठिकाणी एक प्रभारी अधिकारी व झोनल अधिकारी आणि भरारी पथकांची नेमणुक केली आहे. तर आरोग्य विभागाकडुन तालुक्यातील प्रत्येक घरातील व्यक्तीची तपासणी करुन ६० वर्षीवरील जेष्ठ नागरिक तसेच गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या व्यक्ती, लहान मुले यांच्या याद्याा तयार करुन या लोकांना कोरोना होऊ नये म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांची नियमित तपासणी करुन औषधपचार केले जाणार आहेत.

या बैठकीसाठी प्रांतधिकारी राजेंद्र जाधव तहसिलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर, सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, उपसभापती सीमा राऊत, माजी उपसभापती डॉ.संभाजी मांगडे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



आरोग्य कर्मचारी कमी

तर वेल्हे येथील कोविड काळजी केंद्रासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांची इमारत कमी पडल्याने लक्ष्मी गंगा कार्यालयात नवीन ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर गंभीर व अत्यस्थ रुग्णांसाठी नसरापूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात २० खाटांची सोय करण्यात आली आहे.तसेच करोना काळजी केंद्रासाठी कर्मचारी संख्या कमी असल्याने नवीन कर्मचारी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


Post a Comment

1 Comments

  1. All of the games technically adjust 솔카지노 to FOBT legal guidelines, which cowl £100-a-spin roulette on self-service machines. William Hill is testing a game called Wonderball, which can to} permit prospects to stake up to as} £50 by filling in boxes on a printed roulette board. A draw then takes place on TV screens, with prizes of up to as} £25,000 obtainable.

    ReplyDelete