ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

जिल्हा परिषदेत करोना शिरला


प्रशासनासह कर्मचाºयांची पळापळ

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात एक करोना रुग्ण वावरल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. मुख्यालय सील करण्यात आले असून सोमवारी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यामुळे कर्मचारी, अधिकारी यांच्यासह पदाधिकारी चिंतेत आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे कामकाज काही मोजक्या कर्मचाºयांसह सुरू होते. नियमीत बैठकाही सुरू होत्या. तीन-चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची एक बैठक झाली. या बैठकीला समितीच्या सदस्यांसह काही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यातील उपस्थित एका जिल्हा परिषद सदस्याला करोना संसर्ग झाल्याचे रविवारी समोर आले आहे. हा सदस्य या बैठकीत सुमारे तासभर उपस्थित होता. त्याने मुखपट्टीही घातलेली नसून बैठकीत बोलत होते. मुख््यालयात आपल्या गटातील कामाचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या दालनासह विविध विभागात फिरून आले होते. त्यामुळे त्यांना करोना झाल्याचे समजल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे या महाशयांनी काही पदाधिकाºयाबरांबर भोजनही घेतले आहे.
 रविवारी हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने सर्व कर्मचारी अधिकाºयांना संदेश पाठवून सोमवारी काम बंद राहणार असल्याचे कळविले. त्यामुळे जे लोक या करोनाच्या संपर्कात आले आहेत त्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. 

प्रशासनाने सोमवारी कामकाज बंद ठेवले असून मुख्यालय सील करण्यात आले आहे. निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत असून पुढील निर्णय मंगळवारी घेण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले. 


आणखी दोन कर्मचारी बाधित

मुख्यालयातील आणखी दोन कर्मचारी करोना रुग्ण आहेत. यात अर्थ व आरोग्य विभागातील कर्मचाºयांचा समावेश आहे. यामुळे आरोग्य विभागातील तीस कर्मचारºयांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

कर्मचारी अलगीकरणात

या बैठकीत सदस्याच्या आसपास असलेले व ज्यांच्याशी संपर्क आले ती कर्मचारी घरीच अलगीकरण करून घेतले आहे. कुटुंबाला धोका नका म्हणून एका खोलीत स्वतला बंधिस्त करून घेतल्याचे काही कर्मचाºयांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments