ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

वेल्हयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच

जिल्हा परिषद ५७ शाळा संपर्काबाहेर 

मीनल कांबळे
वेल्हे : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील  विद्यार्थ्यांचे  भवितव्य अंधारात आले आहे. जिल्हा परिषदेकडुन विद्यार्थ्यांसाठी आनलाइन शिक्षण पद्धती सुरू केली आहे. पण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५७ शाळांच्या परिसरात मोबाइल टॉवर नसल्याने या परिसरात कोणत्याही नेटवर्क नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे.

वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकुण १४४ शाळा असून ३३०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ऑगस्ट महिना उजाडला तरी देखील शाळा सुरू झाल्या नाहीत. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना आनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. पण तालुक्यातील अठरागाव मावळ, बारागाव मावळ, पानशेतच्या धरणाच्या वरच्या भागातील गावे, शिरकोली, रांजणे, वांगणी, वांगणीवाडी आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नटवर्क नाही. तालुक्यात जिल्हा परीषदेच्या एकुण ५७ शाळांतील विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. 

याशिवाय तालुक्यातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील अनेक अडचणी भेडसावत आहेत. वेल्हे तालुका दुर्गम आणि डोंगराळ असुन कोणतीही औद्याोगिक पाश्र्वभुमी नसल्याने येथील नागरिकांना रोजगाराचा मोठा गंभीर प्रश्न आहे. आपल्या पाल्यास स्मार्ट मोबाईल विकत घेण्याची पात्रता देखील काही पालकांची नाही. त्यामुळे नेटवर्क असूनही हे विद्यार्थी  वंचित राहत आहेत. तर काही विद्याार्थी शेजारी-पाजारी व मित्र मैत्रिणीचा मोबाईल वापरत आहेत. भौगोलिकदृष््ठ्या  विखुरलेला तालुका असल्याने डोंगर दºयांत नेटवर्क मिळत नाही. 
पासली येथील न्यु इंग्लिश स्कुल येथे १५० विद्याार्थी शिक्षण घेत असुन या परिसरात नेटवर्क नसल्याने  विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही तर शिक्षकांना देखील या परिसरात करोनाच्या परिस्थितीमुळे जाता येत नाही. या परिसरातील  विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेता येत नाही.
मोबाईल नेटवर्क नसलेल्या शाळांमधील  विद्यार्थ्यांचे  सध्या तरी भवितव्य अंधारातच आहे. यावर प्रशासन काय तोडगा काढणार असा प्रश्न  विद्यार्थ्यां सह पालकांला पडला आहे.

वर्षे वाया जाणार

अठरा गाव मावळ परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे  विद्यार्थ्यां ना अभ्यास करता येत नाही. तर यंदाचे  विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याची भिती निर्माण झाली आहे. परिसरातील पालक अशिक्षित असल्याने विद्यााथ्र्यांचा अभ्यास त्यांना घरात घेता येत नाही, असे पासली येथील अंकुश तुपे यांनी सांगितले.
 

आठवड्यातुन एकदा शिक्षक घरी

मोबाईल नेटवर्क नसलेल्या शाळांमधील शिक्षक आठवड्यातुन एक दिवस गावात जाऊन  विद्यार्थ्यांचा अभ्यास घरोघरी जाऊन घेत आहेत, असे स्पष््टीकरण उत्तर वेल्हा पंचयत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल मुगळे यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments