वेल्हा,भोर कडकडीत बंद
करोनाचा भोर, वेल्हा तालुक्यात वाढता पादुर्भाव पाहता 23 जुलै ते 31 जुल या कालावतीत कडक टाळेबंदी जाहिर केली असून शुक्रवारी पहिल्या दिवशीपासून याची काटेकोर अमलबजावणी सुरू झाली आहे. याला व्यापाºयांसह नागरिकांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र टाळेबंदीमुळे करोनाची साखळी ना मुंबईत तुटली ना पुण्यात. त्यामुळे करोनावर टाळेबंदी हा एकमेव पर्याय नसल्याने थोडी नाराजी व्यक्त होत आहे.
मीनल कांबळे
वेल्हा : वेल्हातील मुख्य बाजारपेठ मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून सर्व दुकाने बंद ठेवली होती. गावांमधील दुकाने देखील बंद होती. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट दिसत होता. वेल्ह्यााचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून 16 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली आहे. या नाकेबंदी च्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी प्रत्येकाची नोंद घेत आहे. मुंबई, पुणे शहरातून आलेल्यांना प्रवेश दिला जात नाही.
वेल्हे तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 78 झाले असून 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ३३ रुग्णांनी करोना आजारातून बरे झाले आहेत. दोघांचा मृत्यू झालेला आह.े
भोर येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी राजेंद्र जाधव तहसीलदार शिवाजी शिंदे व प्रशासनातील सर्व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये भोर, वेल्हे तालुका दिनांक 23 जुलै ते 31 जुलै दरम्यान टाळेबंदी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे आजपासॅन त्याची अमलबजावणी सुरू झाली आहे. पुणे शहरात रुग्ण संख्या वाढत असून या भीतीने येथील नागरिक भोर, वेल्हे तालुक्यात येत आहेत. त्यामुळे करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. तहसीलदार शिवाजी शिंदे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे तालुका वैद्याकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल ल चरापले, विस्तार अधिकारी महेश दळवी व इतर कर्मचारी यांनी योग्य नियोजन करत आहे.
भोरला पोलिसांचा कारवाईचा धडाका
संतोष म्हस्के
भोर : भोर तालुक्यातही कडक टाळेबंदीचे अमलबाावणी केली जात असून नागरिक व व्यापाºयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पालिसांकडून विशेष मोहिम आखात बेशिस्तांवर कारवाई करण्यात येत आहे.
बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला असल्याने सगळीकडे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. तहसीलदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून नाकेबंदी करण्यात आली होती. यावेळी विनाकारण दुचाकीवर फिरणारे २० तर मास्क न घालणारे २२ जण पोलिसांना आढळून आले यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली. पोलीस प्रशासनाने पोलीस ठाणे हद्दीतील तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये बैठका घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केल्याने बंदला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. शहराच्या चारही बाजूने नाकाबंदी असून कसून चौकशीनंतरच प्रवेश दिला जात आहे. अत्यावश्यक काम असेल तरच सोडण्यात येत असून अन्यथा वाहनचालकांना माघारी पाठवण्यात येत आहे..
भोर तालुक्यात करोना रुग्णांची संख्या १५३ पर्यंत गेली आहे. सद्यास्थीतीत ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ९७ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तालुक्यात १ जणाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्याकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कºहाळे यांनी दिली.
0 Comments