चिंतेत वाढ, रुग्णांचा आकडा १२५ वर
भोर : तालुक्यात करोना रुग्णांनी शंभरी ओलांडली असून गवागावांत संसर्ग वाढत आहे. आठवड्यापासून लागोपाठ पाच ते सहा दिवस कोरोनाचे रुग्णवाढ होत आहे आजपर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा १२५ वर पोहोचला असल्याने भोरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
करोनाचा विळखा आता गावांपर्यंत पोहचला आहे. पुणे जिल्ह्याातील सर्वच तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळत असून रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात पोहचली आहे. यात हवेली तालुका हा अतिसंक्रमित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यातील आजपर्यंतच्या करोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार करून १२५ वर पोहोचला असून यातील ६६ जणांनी करोणावर मात केली आहे. तर ५८ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात भोर येथील करोना काळजी केंद्रात ३७ तर पुणे येथील येथे २१ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्याकीय अधिकारी डॉ. सुर्यकांत कºहाळे यांनी दिली.
तालुक्यात श्निवारपर्यंत करोना संसर्ग बाधित अहवालानुसार भाटघर धरण शेजारील संगमनेर २, शिंदेवाडी ५, वेळू २, कांजळे १, पोंबर्डी-१ , उतरवली १ आणि किकवी १ अशा १३ बाधित रुग्णांचा समावेश आहे. आणखी २१ जणांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या गावात कंटेनमेंट झोन जाहीर केला असून गावांच्या सीमा बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी केल्या आहेत.
0 Comments