गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घघाटन
पुणे : सध्या करोना काळात पोलीस बळ कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात व्यस्त आहे. आश काळात गुन्हेंगारी प्रवृत्ती डोक वर काडू शकतात. त्यामुळे आधुनिक तंत्राचा वापर करीत सराईत गुन्हेगारांवर विशेषत: हद्दपार केलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी एका मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपचा शुभारंभ शनिवारी गृहमंत्री अतिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्याातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री देशमुख यांनी कोरोना आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली.
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पुणे शहर पोलिसांनी हद्दपार आरोपीतांकरीता केलेल्या "ExTra" (Tracking of Externees) अॅपची माहिती दिली. पुणे शहरामधून हद्दपार झालेल्या इसमास त्याने पुन्हा पुणे शहरात येवुन गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता अॅप विकसित करण्यात आले असल्याचे सागतले.
या अॅपमुळे हद्दपार गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल. हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हद्दपार गुन्हेगारावर निगराणी / देखरेख करणे सोयीस्कर होईल. कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे शक्य होईल. हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवून दाखल होणाऱ्या गुन्ह्याांचे प्रमाण कमी होवून पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये वास्तव्यास असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील नमुद गुन्हेगारावर प्रभावी निगराणी ठेवू शकतील, असे बच्चन सिंग यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी "स्मार्ट पोलिसिंग" बाबत माहिती दिली. बैठकीस इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कसरतपटू शांताबाई पवार यांना मदत
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू श्रीमती शांताबाई पवार (वय वर्ष 85) यांना एक लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरविण्यात आले. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले, आजी या वयातही परिवार चालविण्यासाठी काम करतात. त्यांना शासकीय योजनेतून योग्य ती मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या ‘भरोसा सेल’ मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात आली आहे. पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्याचाही प्रयत्न केला जाणार असलयाचे सांगून जिल्हयातील गणेशोत्सव तसेच बकरी ईदच्या पाशर््वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्यसंपन्न असल्याचे दाखवून दिले.
0 Comments