इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व त्यांच्या पत्नी अनुराधा गारटकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दोन दिवसांपूर्वी गारटकर यांना ताप आल्याचे जाणवले. दक्षता म्हणून त्यांनी स्वतःची व पत्नीची कोरोना तपासणी केली होती. त्याचा आज अहवाल आला. ते कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी ते पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यानच्या काळात त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला,त्यांच्याबाबत त्यांनी आरोग्य विभागास माहिती दिली आहे.
आम्हा दोघांची ही प्रकृती उत्तम आहे. केवळ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयात दाखल झालो आहोत,असे गारटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिका-यांनी कोरोना काळात स्वत:ची काळजी घ्यावी,असे ही आवाहन त्यांनी केले आहे.
1 Comments
Merkur Slots Machines - SEGATIC PLAY - Singapore
ReplyDeleteMerkur Slot Machines. www.jtmhub.com 5 star rating. https://septcasino.com/review/merit-casino/ The Merkur Casino septcasino game was the first febcasino.com to feature video slots in aprcasino the entire casino,