भोर : करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून काशी बेशिस्त रुग्णांमुळे यात मोठी वाढ होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. असाच एक प्रकार भोर तालुक्यातील हातवे येथे समोर आला आहे. पुण्यात राहणारे येथील एक कुटुंब करोनाची चाचणी सकारात्मक आली असताना पत्नी व मुलांसह दुचाकीवरून हातवे गावात आले. याची माहिती भोर प्रशासनाला मिळताच त्यांनी हातवे गावात धाव घेतली. त्या बाधित कुटुंबाला समजावून रुग्णवाहिकेत बसण्याची विनंती केली मात्र त्यांनी तेथूनही दुचाकीवरून पळ काढला.
त्यांच्या बेशिस्तीमुळे प्रशासनासह हातवे गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
या बाधित कुटुंबाविरुध्द राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील नºहे-आंबेगाव येथे वास्तव्य करणारे हे कुटंब पुण्यात कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांच्या तपासणीमध्ये पती वय ३५ ,पत्नी वय ३० सात वर्षांची मुलगी, चार वर्षांचा मुलगा असे चारही जणांचा अहवाल करोना सकारात्मक होते. दरम्यान हे कुंटंब त्यांच्या मुळगावी हातवे खुर्द येथे निघुन आल्याने हवेली आरोग्य विभागाने भोर प्रशासनाला कळविले. त्यानुसार हातवे ता.भोर येथे हे कुटंब असल्याची माहिती मिळताच गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्याकीय अधिकारी सुर्यकांत कºहाळे, सरपंच रामचंद्र खुटवड, तलाठी अन्वर शेख, ग्रामसेवक श्यामबाला मुळे यांनी घटनास्थळी जाऊन बाधित दापंत्याला समजावून उपचारासाठी दाखल होण्याची विनंती केली. मात्र मद्याप्राशन केलेल्या एका नातेवाईकाने दापंत्य यांची बाजू घेत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. करोनाबाधित दापंत्य यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आमची पुण्यात चाचणी झालीच नाही असा पवित्रा घेत आम्हाला कोरोना झाला नाही. तुमच्याकडे पुरावा आहे का? असा सवाल करत उपचारासाठी नकार दिला. शेवटी गटविकास अधिकारी तनपुरे यांनी हवेली प्रशासनाकडून आलेले चारही जणांचे चाचणी अहवालचा पुरावा दाखवत तुम्ही विनाकारण चिडू नका. आम्ही तुमच्या भल्यासाठीच आलेलो आहोत. उपचारासाठी चला अशी विनंती केली. यावेळी बाधित दापंत्य यांनी रुग्णवाहिकामध्ये न बसता आमचे आम्ही दुचाकीवरून नसरापूर येथील रुग्णालयात येतो असे सांगितले. मात्र दोन्ही मुलांसमवेत आड रस्त्याने पलायन करून पुन्हा पुण्याला गेले. गटविकास अधिकारी तनपुरे यांनी याबाबत माहीती देताना सांगितले की, पलायन केलेले या कुटुंबाबद्दल नंतर शोध घेतला असता ते पुन्हा पुण्याला गेले व तेथे उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
0 Comments