ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

जिल्हयात सर्वदूर संसर्ग


जिल्हयात सर्वदूर संसर्ग,
२२७२ करोना रुग्ण, हवेलीत हजारच्या घरात

पुणे : करोनाचा विळखा आता गावांपर्यंत पोहचला आहे. पुणे जिल्ह्याातील सर्वच तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळत असून रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात पोहचली आहे. यात हवेली तालुका हा अतिसंक्रमित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. 
महाराष्ट्रात मोठ्या शहरांत आतापर्यंत करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत होता. त्यात दिल्ली, मुंबई, पुणे ही शहरे सर्वाािधत प्रभावीत झाली होती. टाळेबंदीत या शहरात करोना संपर्क वाढतच होता. मात्र टाळेबंदीत निर्बंध उठवल्याने शहरात ये-जा करणाºयांवर निर्बंध असल्याने ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण हे अत्यल्प होते. टाळेबंदीमुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे सरकारने जिल्हाअंतर्गत काही निर्बंध उठवत हळूहळू व्यवहार सुरू केले. त्यामुळे नागरिकांचे शहरात ये-जा वाढली. मुंबई,पुण्यातून नागरिक गावकडे ये जा करू लागल्याने हळूहळू करोनाचा संसर्ग हा गावापर्यंत पोहचू लागला आहे. 
आज पुणे जिल्हयातील तेरा तालुक्यात करोनाबाधितांची संख्या ही सोमवारपर्यंत २ हजार २७२ पर्यंत पोहचली आहे. सोमवारी एका दिवसात १२८ रुग्ण आढळले आहेत. 
 
यात हवेली तालुक्यात ९१८ इतके सर्वाधिक रुग्ण असून त्या खालोखाल खेड तालुक्यात २८१, मुळशी २३६, मावळ १५१, जुन्नर१४१, शिरुर १२४, आंबेगाव ९६, भोर ८१, दौंड ७७, पुरंदर ७६, वेल्हा ३९, इंदापूर ३३, बारामती १९ आतापर्यंतचे करोना रुग्ण सापडले आहेत. 
त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. आता अगर्दी दुर्गम भागातही करोनाचे रुग्ण सापडत आहेत.  
 
या संदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिाकारी भगवान पवार यांनी यापुढे ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही दिवस कोणाच्या संपर्कात येऊ नये. आरोग्य विभागाने ग्रामीण भागतही आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला असून नऊ हजार खाटांचे नियोजन आहे. यातील 4500 खाटा कार्यान्वीत झाल्या आहेत. यात काही ठिकाणी प्राणवायूचीही व्यवस्था करण्यात येत असल्यास पवार यांनी सांगितले. 

६५ रुग्णांवर घरीच उपचार 

जिल्हातही अंशता लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत असून ही संख्या 65 इतकी आहे. या रुग्णांना काय काळजी घ्यावी याचे वारंवार मार्गदर्शन केले जात असून आमचे आरोग्य दूत त्यांच्या संपर्कात असल्याचे पवार यांनी सांगितले. 

Post a Comment

1 Comments

  1. Top 10 Casino Apps - Casinoworld
    In this section we'll walk you through deccasino our selection of top casino apps, and hopefully you'll 토토사이트 find plenty of worrione useful information หาเงินออนไลน์ on the top How do 1등 사이트 you use PayPal?Are there any deposit bonuses at your casino?

    ReplyDelete