राजगड टाइम्स टीम
पुणे :करोना संकटाने गेल्या चार-पाच महिन्यांत अनेक बदल घडवून आणले आहेत. यातील एक सकारात्मक बदल म्हणजे सुशिक्षीत तरुणांना शेतीचे महत्व कळाले आणि आतापर्यंत आंम्ही शेतकºयाची पारं म्हणून शहरांमध्ये मिरवणाºया व शेतीच्या बांधावर उभं राहून गप्पा मारणारा हा सुशिक्षीत तरुण आता भातलागवडीसाठी चिखलात उतरलेला दिसला.
सध्या पावसाळा सुरू असून या दिवसात खरीपातील महत्वाचे पीक असलेल्या भात पिकाची लागवड सुरू आहे. खरीपात कृषी विभाग या पिकाला महत्वाचे पीक म्हणतो मात्र पुणे जिल्ह्याात तरी प्रशासकीय पातळीवर दुर्लक्षीत पीक असेच म्हणावं लागेल. सर्वात जास्त क्षेत्रावर हे पीक घेतले जाते मात्र भात शेतीतून लाखो रुपये कमवले असे आपल्या तरी जिल्ह्याात कुठे ऐकीवात नाही. कारण या पिकाच्या आधुनिक पद्धतीकडे अजून ना प्रशासनाने लक्ष दिले ना भातपीक घेणाºया शेतकºयांच्या पारांनी....कारण अतिशय काबाडकष्टाचे काम असल्याने केवळ आई वडिलांची इच्छा म्हणून आजची शिकलेली तरुण पीढी आपल्या वृद्ध आई बापाला मदत करताना दिसत होती. यात काही तरुण शेतकरी आवडी व सवडीनेही हे काम करीत असत.
सध्या गेल्या महिनाभरापासून खरीपातील भात शेतीत अनेक दिग्जांपासून गावां गावांतील तरुण वर्ग रमताना दिसला. समाजमाध्यमांवर भात लागवड करताना सध्या या तरुण शेतकºयांची छायाचित्र, चित्रीकरण पाहण्यास मिळाली. काहींनी भात लागवड करताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या... त्या वाचून आनंद झाला... पण तो टिकायला हवा...
मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक, कलाकार प्रवीण तरडे यांनी आपल्या भातशेतीत मुळशी पॅटर्नच्या टिमबरोबर काम केले. त्यांनी समाजमाध्यमांवर आवाहन करीत भातशेतीबाबत त्यांची व त्यांच्या कुटुंबाची अस्था प्रकट केली. हा माणूस खरंच मातीतला वाटतो. जे काही लिहीतो, तयार करतो ते मातीतलंच असते. तरडेंचे व्यक्तीमहत्व प्रेरणादायी वाटते.
यावर्षी आपला तरुण शेतकरीही खºया अर्थाने बांधावरून चिखलात उतरला असे म्हणावे लागले. समाजमाध्यमांवर प्रसारित होणारे चित्र पाहता...भातखाचरांत जीव लावताना हा तरुण दिसला. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यातील काहींची नोंद घ्यावसी वाटली.
वावर आहे तो पावर आहे...
हा बदल चांगल्या अर्थाने घ्यावसा वाटतो. टाळेबंदीत शहरात हाताला काम नसले तरी आमच्या शेतात नांगर मात्र माझ््या हातात आहे, असे सांगत काहींना वावर आहे तो पावर आहे, आशा पोस्ट टाकल्या .
पहिल्यांदाच या चिखलात पाय टाकल्यानिमित्त आपल्या भावनांचा बांध फोडला...
ही वेळ कधी यंईल असे वाटले नव्हते. लहानपनापासून मुंबईत वाढलो. गावाकडे नेहमी जाणे येणे होते पण भात शेतीचा अनुभव कधी घेतला नव्हता. सध्या करोनामुळं गावाकडे असल्याने पहिलांदा चिखलात पाय ठेवला आणि मातीशी नातं जुळलं. यापुढे दरवर्षी पडून असलेली आमची शेती करणार अशी बोलकी भावना काहींना व्यक्त केली आहे.
ही बाब सकारात्मक चित्र निर्माण करणारी आहे. शिकलेल्या तरुण मुलांना शेतीविषयी आवड निर्माण होत असून ते या भातशेतीत आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीतून तरुण शेतकºयाने लाखो रुपये कमावले अशी वृत्तपत्रांत बातमी बचायला मिळेल ही आशा करूया...
आई-बापाला काय वाटलं असेल...
दरवर्षी पावसाळ्यात भात लागवडीचे दिवस सुरू झाले की गावातील वृद्ध आई-बापाची ओढ मुलं कधी येणार याकडे लागलेली असते. दुसºयाच्या शेतात काम सुरू झालं की त्याला चिंता लागून राहते की माझं शेत पडून तर राहणार नाही ना. म्हणून तो सत्तरी आेंलांडलेला आई-बाप या वयातही शेतात पाय ठेवता व कसबंसं आपलं शेत लावून घेतो. यावर्षी जवळपास सर्वच मुलं गावात असल्याने कुणाला हा प्रश्न पडलाच नाही. प्रत्येकाच्या शेतात दहा पंधरा माणसं भातलागवड करताना दिसली.
0 Comments