होय! भोर तालुक्याने एकदा का होईना माथाडी कामगार चळवळीचे अध्यक्षस्थान भूषवले होते...
भिकाजी लक्ष्मण राजिवडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
इतिहासाच्या पानापानात भोरचे नाव असल्याशिवाय ते पान उलटत नाही हे सत्य असले तरी स्वातंत्र्यानंतरही भोरच्या मावळ्यांमधील समाजाप्रती असलेली निष्ठा काही संपलेली नाही. असे अनेक लोक आहेत की त्यांनी केलेले कार्य हे खरंच खूप मोठे होते, पण ते अपरिचित राहिले. असेच एक व्यक्तीमहत्व नुकतेच काळाच्या पडद्यााआड गेले. राजगड टाईम्स या योद्धांचा इतिहासही कधी पुसू देणार नाही. कायम त्यांच्या कार्याच्या आठवणी आपल्याप्रती तााज्या ठेवत आपल्याला प्रेरणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेले.
कै. भिकोबा लक्ष्मण राजिवडे त्यांचे २१ जुलै २०२० रोजी त्यांच्या मूळगावी पांगारी येथे निधन झाले. त्यांना स्मरण करणे आपले कर्तव्यच आहे. होय, कारण त्यांनी माहराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्षपद भूषवले होते व माथाडींच्या हितासाठी त्यांनी या संघटनेच्या पहिल्या दिवसापासून कै. अण्णासाहेब पाटील यांच्याबरोबर खांंद्यााला खांदा लाऊन काम केले आहे.
होय, आपल्या भोर तालुक्याने एकदा का होईना राज्यातील या सर्वात मोठ्या माथाडी, हमालांसाठी काम करणाºया संघटनेचे अध्यस्थान राजिवडेंच्या रुपाने भूषवले होते.
कै. भिकोबा लक्ष्मण राजिवडे यांचे दिनांक २१ जुलै २०२० रोजी त्यांच्या मूळगावी पांगारी . तालुका भोर जिल्हा. पुणे येथे आकस्मित दु:खद निधन झाले.
कै. भिकोबा लक्ष्मण राजिवडे यांचा जन्म भोर तालुक्यातील वेळवंड खोºयातील पांगारी या गावी स्वातंत्र्य पूर्व काळात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कै. लक्ष्मण कुशाबा राजिवडे व आईचे नाव कै. गंगूबाई होते. त्यांचे शिक्षण लिहिण्यावाचण्यापुरते झाले होते. त्यांचे बालपण गावातच गेले. गावी शेतीच्या उत्त्पानातून कुटुंबाचा उदरनिर्वाह अशक्य असल्याने रोजगारासाठी त्यांनीही मुंबईची वाट धरली.
मज्जीद बंदर येथे अन्नधान्याच्या वखारी असत. त्याला दाणाबंदर असे म्हणत. त्या दाणाबंदर मार्केट मध्ये त्या काळी भोर तालुक्यातील व वेळवंड खोºयातील अनेक लोक हमाल म्हणून अतिशय तुटपुंज्या रोजंदारीवर करीत असत. मालकाच्या वखारीतच राहून बाहरेच्या खानावळीत जेवण करत असत. त्यामुळे भिकोबा राजिवडे ही या ठिकाणी कामाला राहिले व हमाल म्हणून काम करू लागले. उंचपुरी व सडपातळ शरीरयष्टी , नजरेमध्ये धाक, बोलण्यामध्ये स्पष्टवक्तेपणा, उत्कृष्ट भाषणशैली, कष्टाळूवृत्ती व प्रामाणिकपणा हे गुण त्याच्यात असल्यामुळे अल्पावधीतच ते दाणाबंदर मार्केटमधील हमाल आणि कामगारांमध्ये आवडते झाले. दाणाबंदरमध्ये काम करत असताना त्यांना पश्चिाम महाराष्ट्रामधील म्हणजेच घाटावरून मुंबई मध्ये कामधंद्याासाठी आलेल्या लोकांच्या ओळखी पाळखी्र झाल्या.दरम्यानच्या काळात म्हणजेच १९६२ साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी हमाल कामगारांसाठी ऐतिहासिक चळवळ सुरु केली कै.भिकोबा राजिवडे त्याच दरम्यान अण्णासाहेब पाटील यांच्या संपर्कात आले व एक विश्वाासू साथीदार बनले.त्यानंतर कै.अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार संघटनेची घोषणा केली. त्यावेळेला राजिवडे साहेब सदैव त्यांच्या बरोबर होते. १९६४ साली जेव्हा अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे रितसरनोंदणी केली तेव्हापासून राजिवडे साहेब हे अण्णासाहेब पाटलांचे एकनिष्ठ विश्वाासू व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून युनियनचे काम पाहू लागले. काही वर्षांनंतर म्हणजेच १९७५ साली आशिया खंडातील एकमेव बलाढ्य अश्या माथाडी युनियनच्या तिस्ºया अध्यक्षपदाची माळ स्वर्गीय. अण्णासाहेब पाटील यांनी हजारो माथाडी कामगारांच्या साक्षीने भोरच्या या युवा कार्यकत्र्याच्या म्हणजेच स्वर्गीय भिकोबा लक्ष्मण राजिवडे यांच्या गळ्यात घातली.आणि सलग तीन वर्ष त्यांनी युनियनच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळला. संघटनेमध्ये अध्यक्ष पदाला फार महत्वाचे स्थान आहे. आतापर्यंंतच्या माथाडी संघटनेच्या इतिहासात भोर तालुकयातील भिकोबा राजिवडे हे एकमेव माथाडी कामगार आहेत की जे अध्यक्ष पदावर पोहोचले. ते केवळ अण्णासाहेब पाटील यांच्या विश्वासामुळे व हजारो माथाडी कामगारांच्या प्रेमामुळे . ते नेहमी सांगत असत की, जर अण्णासाहेब पाटील जन्माला आले नसते तर माथाडी कायदा कधीच निर्माण झाला नसता. आम्ही माथाडी कामगार मुंबईमध्ये ताठ मानेने चालतो ते केवळ अण्णासाहेबांच्या पुण्याईमुळे. राजिवडे यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये अण्णासाहेब पाटलांच्या बरोबरीने त्याना महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सानिध्यात जाण्याचा व जवळून मार्गदर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यामध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील साहेब, माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण साहेब व माजी मुख्यमंत्री श्री.शरदचंद्र पवार साहेब तसेच महाराष्ट्रातील त्यावेळेच्या अनेक मंत्र्यांना जवळून अनुभवण्याचा योग त्यांना मिळाला.स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी कामगारांसाठी पुकारलेल्या संप, मोर्चे आणि उपोषणांमध्ये भिकोबा राजिवडे नेहमी अग्रभागी असायचे. राजिवडे साहेब यांचे अण्णासाहेब पाटील आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर जिव्हाळयाचे व आपुलकीचे संबंध होते.
२३ मार्च १९८२ रोजी मुंबई येथे कै.अण्णासाहेब पाटील यांचे आकस्मित दु:खद निधन झाले.हा दिवस हजारो माथाडी कामगार व पाटील कुटुंबीयांसाठी काळा दिवस ठरला .
कै.अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर युनियनमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु झाला. त्यावेळी राजिवडे पाटील कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.
राजिवडे साहेब यांना माथाडी कामगार चळवळीतील योगदानाबद्दल संघटनेने माथाडी भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. आज माथाडी कामगार युनियनला व माथाडी कायद्याला जवळपास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ५० वष्र्याच्या काळात राजिवडे साहेबांनी वेळवंड खोऱ्यातील व भोर तालुक्यातील अनेक तरुणांना मार्केट मध्ये नोकरी धंधा मिळवून दिला.
त्यांची कर्मभूमी जरी मुंबई असली तरी ते आपल्या जन्म भूमी ला म्हणजे पांगरी गाव व भोर तालुक्याला कधी विसरले नाहीत. पांगारी गावाच्या विकासामध्येही राजिवडे साहेबांचा सिहांचा वाटा राहिला आहे.
मात्र ते प्रसिद्धीसाठी त्यांनी कध्घ्ी आपल्या या कार्याचा वापर केला नाही. सदैव तळमळीने काम करीत राहिले. त्यामुळे ते तालुक्यात तेवढे परिचित राीहले नाहीत, पण त्यांचे कार्य हे तालुक्यासाठी अभिमानास्पदच आहे. आशा या ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीतील महान माथाडी कामगाराला व कै. अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या विश्वाासू सहकार्याला राजगड टाइम्सचा मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments