ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

रिक्षाचालकांना मदतीचा हात


भोर युवा फाऊंडेशनचा उपक्रम

भोर : स्थापनेपासूनच वेगळे अस्थित्व निर्माण करणाºया नवी मुंबईतील भोर युवा फाऊंडेशनने करोनाच्या संकटातही आपले समाजकार्य सुरू ठवले आहे. संघटनेच्या वतीने भोर तालुक्यातील नवी मुंबईस्थित रिक्षाचालकांना त्यांच्या सद्यााच्या परिस्थितीचा विचार करून जीवनावश््यक वस्तूंचे वाटप केले. समारे सव्वाशे रिक्षाचालकांना याचा फायदा झाला आहे. 
मुंबई, नवी मुंबईत नोकरी, धंद्याानिमित्त वास्तव्यास असलेल्या आपल्या तालुक्यातील युवकांना एकत्र आणण्यासाठी भोर युवा फाऊंडेशन, नवी मुंबई या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे नावासाठी अध्यक्ष,उपाध्यक्षांची निवड न करता सर्व सभासद हेच संघटनेचे प्रमुख असून राजकारणविरहीत समाजकार्य करीत आहेत. 

या संघटनेचे कार्यकर्ते टाळेबंदीत विखरले गेले होते, मात्र त्यांच्यातील समजकार्याची इच्छाा त्यांना गप्प बसू देत नव्हती. करोनाच्या सद्यापरिस्थितीत सद्याा रिक्षाचालकांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. भोर तालुक्यातील अनेकजण नवी मुंबईत रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र टाळेबंदीत त्यांच्या व्यवसाय सुरुवातीला बंद होता व आता काही प्रमाणात सुरू झाला असला तरी निर्बंधांमुळे त्यांना खूप मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यांच्या कुटुंबीयांची ही अडचण लक्षात घेऊन संघटनेन जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून त्यांना वाटप केले आहे. आतापर्यंत  सव्वाशे रिक्षाचालकांना त्यांनी मदत केली आहे. या काळात अनेक जण गरजूंना मदत करीत आहेत. मात्र या संस्थकडे कोणतेही भागभांडवल नसताना सदस्यांनी आपल्या खिशातून वर्गणी काढत ही मदत केली आहे. या संकटात प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यांनी केलेल ही मदत कौतुकास्पद आहे. मदतीचे वाटप करताना फोटो काढून प्रसिद्ध केले नाहीत.  

Post a Comment

0 Comments