लवकरच केंद्र शासनाच्या सेवेत
भोर : गेली सत्तावीस वर्षे समाजातील तळातील घटकांसाठी काम करीत वडिलांनी लावलेले समाजसेवेचे रोपटे हृषिकेश कोंडे याला केंद्र शासनाच्या सेवेत राहून मोठ करायचे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याला यश मिळाले असले तरी त्याची जिल्हाधकारी होण्याचे स्वप्न असून सेवेत राहून पूर्ण करण्याची इच्छा त्याने रायगड टाइम्सशी बोलताना व्यक्त केली. विशेष म्हणजे वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्याने हे यश मिळवले आहे.
हृषिकेश कोंडे याने केंद्रीय लाकसेवा आयागोची परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळावलं असून देशातून अंतिम निवड झालेल्या 829 मुलांमध्ये त्याचा 688 वा रँक आहे. हृषिकेश हा भोर तालुक्यातील साळवडे गावचा असून त्याच्या या यशाने भोर तालुक्याची मान अभिमानाने उंच केली आहे. त्याने ही परीक्षा जिल्हाधिकारी हाण्याचे स्वप्न पाहत दिली. मात्र, त्यात तो थोडा कमी पडला असला तरी पहिल्याच प्रयत्नात त्याने मिळवलेले यश खरंच कौतुकास्पद आहे.
त्याचे शालेय शिक्षण पुण्यातील टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून झाले. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून ट. अ. इकॉनॉमिक्स व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामधून ट. अ. पॉलिटिकल सायन्स केले आहे.
त्याचे वडिल वडिल श्रीपाद कोंडे हे गेली 27 वर्षे पूर्ण वेळ सामाजिक कामात आहेत. पुणे जिल्हा आरोग्य देखरेख समिती व कुपोषण विषयावरील जिल्हा गाभा समितीचे ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्याातील दिडशे गावांत रचना संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण मुलांच्या शिक्षण, पोषण, महिला आरोग्य, पर्यावरण व रानभाज्या यावर जनजागृती करीत आहेत. कवी, निवेदक म्हणून छंद जोपासत आहेत. आई व वडिलांना दोघांनाही किर्तनाची आवाड असून यातूनही ते प्रबोधनाचे काम करीत आहेत.
लहानपनापासूनच हृषिकेशला वडिलांच्या या समाजकार्यातून तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचे इावड निर्माण झाली होती. त्याने आपली हुशारी व बुद्धमतेच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते.
प्रवीण चव्हाण यांच्या मार्गी सस्थेच्या माध्यमातून त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली व पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला आहे. सेवत रूजू झाल्यानंतर अभ्याास कायम सुरू ठेवत आपले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न तो पूर्ण करणार आहे. त्याचा लहान भाऊ ओंकार याने फिल्म एडिटिंग चा डिप्लोमा केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या आरोग्य विषयक शॉर्ट फिल्म स्पर्धेत त्याने राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे. त्यासाठी त्यांनी गडचिरोली येथील एका आदिवासी कुटुंबातील यशस्वी डॉक्टर मुलीची कथा चित्रीत केली आहे.
2 Comments
Congratulations to you on your achievements. Proud moment for Bhor taluka and Konde Deshmukh family. Keep it up !!
ReplyDeleteHarrah's Casino - Mapyro
ReplyDeleteWelcome to the fun at Harrah's Cherokee Valley River 광주 출장안마 Casino and Hotel, with over 1,300 slot 광명 출장샵 and 시흥 출장샵 live table games 파주 출장안마 and a 24-hour poker room, Harrah's Cherokee 춘천 출장마사지 Valley River