ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

राज्यातील मोठ्या बाजार समितीवर भोरचे उपसभापती

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी धनंजय वाडकर

भोर : गेली सहा वर्षे प्रशासकीय राजवट असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड झाली असून उपसभापतीपदाचा मान पश्चिम महाराष्ट्राला मिळाला आहे. भोरचे धनजंय वाडकर यांची सोमवारी उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तर सभापतीपदीचा मान माराठवाड्याला मिळाला असून अशोक डक हे सभापती झाले आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक मोठी उलाढाल असलेली बाजार समिती आहे. राज्यातील 305 बाजारसमित्यांची शिखर संस्था असल्याने या बाजार समितीवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नात असतात.

43 वर्षांमध्ये आतापर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष हे पद प्रत्येकी दहा जणांनी भूषविले आहे. या बाजारसमितीचे संचालक होण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांमध्ये चढाओढ असते. यापूर्वी पुणे जिल्ह्याातील कुमार गोसावी यांनी या बाजारसमितीचे सभापतीपद भूषविले असून अनेक वर्षे ते बाजारसमितीवर संचालक होते. त्यानंतर आता धनंजय वाडकर यांना या बाजारसमितीवर उपसभापती होण्याचा मान मिळाला आहे. बाजारसमितीचे उपसभापतीपद हे सभापतीपदा एवढेच महत्वाचे असते. सभापतीपदाचे सर्व अधिकार हे उपसभापतींना असतात. त्यामुळे भोर तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, माथाडींच्या त्यांच्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

आमदार संग्राम थोपटे यांनी वाडकर यांची निवडणूक प्रतिष्ठेची करीत त्यांना निवडून आणले होते. तसेच त्यांना सभापती, उपसभापती करण्यासाठी कस लावला होता. यापूर्वीचे बाजारसमितीचे संचालक कॉंग्रेसचे प्रदीप खोपडे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार संग्राम थोपटे यांच्याही फारकत घेत भाजपत प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत याच गटातून प्रदीप खोपडेही रिंगणात होते. त्यामुळे थोपटे यांनी वाडकर यांनी निवडून आण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना निवडून आणण्याबरोबर बाजारसमितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठीही गेले काही दिवस प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येत धनंजय वाडकर यांची सोमवारी उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. वाडकर हे ससेवाडी गावचे असून त्यांनी भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचेही सभापती पद भूषविले आहे.

बाजारसमितीचे संचालक मंडळ

अशोक डक सभापती, धनंजय वाडकर उपसभापती, बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, अद्वय हिरे, जयदत्त होळकर, वैजनाथ शिंदे, शंकरर्, ंपगळे, अशोक वाळूंज, नीलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे व माथाडी नेते शशिकांत शिंदे.   


Post a Comment

0 Comments