रस्त्यांनी काढली भोरची लाज....
कोणत्याही रस्त्याने जा खड्डे तुमच्या सोेबतीला असतीलच
स्थनिकांसह पर्यटकांकडूनही नाराजी
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरून भोरला जातानाच प्रत्येकाला आपल्याला पुढे कोणत्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, याची कल्पना येते. महामार्गावरून कापूरहोळपर्यंत पोहचल्यानंतर वाहनचालक प्रथम वाहनातून उतरून आपल्याला काही झाले तर नाही ना याची तपासणी करून पुढील प्रवासाला सुरूवात करीत आहेत. प्रचंड धक्के खात हा अर्धा एक तासाचा प्रवास करावा लागत आहे. आता राष्ट्रीय महामार्गावर जर ही परिस्थिती असेल तर तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
भोर शहरातून कोणत्याही भागात जा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खराब रस्ते तुमची सोबतीला असतील. अगदी भोर -महाड रस्त्यावरही प्रचंड खड्डे पडलेले आहेत. भोर-शिरवळ, भोर-कारी, भोर-नेरे, भोर-पांगारी, भोर-मळे वा भोर-महुडे, या सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
खरंतर हे चित्र दरवर्षीच असते. पावसाळा संपला की तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यामुळे पावसात ती मलमपट्टी वाहून जाते व गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट दुरावस्था होते. हे चित्र अनेक वर्षे सुरू असल्याने हे डांबरी रस्ते आहेत की खडी मातीचे हा प्रश्न निर्माण होतो.
खरं तर भोर तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले हे खड्डे पाहता यांना खड्डेही म्हणता येणार नाहीत. कारण खड्ड्यांचीही एक सीमीत व्याख्या असते. पण हे खड्ड याही पलीकडचे आहेत. रस्ते उभे आडवे फाटलले असून प्रचंड खडी रस्त्यावर आलेली आहे. एखाद्याा ओढ्या नाल्यातून बाहेर पडल्यासारखे एक एक खड्डा काही ठिकाही पार करावा लागतो. इतकी भयंकर अवस्था आहे.
त्यामुळे स्थानिककांकडून याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. समाजमाध्यमांवर नागरिक आपल्या या तीव्र भावना व्यक्त करीत आहेत. खरंतर त्या इतक्या टोकाच्या आहेत की त्या या ठिकाणी मांडताना नको वाटले.
इतकी प्रचंड दुरावस्था असताना प्रशासन म्हणजे राज्याचे व जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभाग भोर तालुक्यात आहे की नाही असा प्रश्न निर्माण होता. त्यांना या रस्त्यांची अवस्था दिसत नाही का?
लोकप्रतिनिधींनीबाबतही तरुणांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खासदार, आमदार जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. खसदार सुप्रिया सुळे यांना तर या तरूणांकडून समाजमाध्यमांवर थेट आवाहनच करण्यात आले आहे. ताई, एक सेल्पी आपला मतदारसंघ असलेल्या भोर तालुक्यातील खड्ड्यांबरोबही काढा. आमदारांविषयी संताप व्यक्त होत आहे.
राजगड टाइम्सच्या अहवानाला प्रतिसाद
समाजमाध्यमांवर भोर तालुक्याविषयी रस्त्यांविषयी संताप व्यक्त होत असताना राजगड टाइम्सने आपल्या भागातील रस्त्यांची परिस्थिती असलेली छायाचित्र व माहती देण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत काहींना पाठवलेले फोटो पाहूनही हे रस्ते आहेत का? असाच प्रश्न निर्माण होतो.
ज्ञानेश्वर बैलकर, राजू आंबळे, रोहित तुपे, दिपक नवघणे, अनिकेत कोंडाळकर यांनी आपल्या भागातील रस्त्यांविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आंम्ही कोणाविरोधात नाही की कोण्त्या पक्षाचे पदाधिकारी नाही. इतर तालुक्यातील परिस्थिती पाहिली की आपल्या तालुक्यातील ही परिस्थिती पाहून खूप वाईट वाटते. आंम्हाला भोरचा अभिमानच आहे, पण हे चित्रही बदलेले पाहिजे... आंम्ही मतदान कशासाठी करतो..? असे काही प्राथ्मिक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
0 Comments