भोर : वेळवंड खोºयातील म्हाळवडी गाव नेहमीच विविध समाजउपयोगी योजना व गाव विकासासाठी विविध उपक्रम राबवित असल्याने चर्चेत असते. करोना काळातही येथील ग्रामस्थांनी तरुणांच्या क्रयशक्तीचा सकारात्मक वापर करीत विविध उपक्रम राबविले आहेत. नुकताच त्यांनी माझे गाव माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत गाव स्वच्छता मोहीम हाती घेत गाव प्लास्टिकमुक्त केले.
दिड हजार लोकसंख्या असलेले म्हाळवडी गाव असून गावात दोनशे ते तीनशे घरे आहेत. भोर शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असून सामाजिक उपक्रमात गाव नेहमीच सहभागी होत असते. करोना काळातही गावातील ग्रामस्थांसह तरुणांनी व विशेषत महिलांनी सामाजिक भान ठेवत करोना नियमांचे कठोर पालन तर केलेच शिवाय गावात विविध उपक्रम राबवत गरजूंनाही मदत केली.
करोना प्रादुभाव भोर तालुक्यात सुरू झाल्यापासूनच गावाने काळजी घेतली आहे. गावात करोना रुग्ण नसतानाही सुरुवातीपासून त्यांनी गाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेत जंतूनाशक फवारणीस सुरुवात केली आहे. आता दर आठवडयाला गावात फवारणी करण्यात येत आहे.
गावातील अनेक तरुण नोकरीनिमित्त मुंबई, पणे व भोर तालुक्यात ये-जा करीत असतात. त्यातून काहीजण गावात करोनाचे वाहक झाले होते. हे लक्षात येताच गावाने दक्ष होत विशेष काळजी घेतली आहे. बाहेरुन येणाºयांचे विलगीकरण शाळेत केले जात असून त्यांना आवश्यक सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यांनी गावात जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप केले. गावातील लोकांनी मदतीचा हात पुढे करीत काही निधी जमा करीत त्यातून दोनशे घरांत त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
गणपती उत्सव साधेपणाने
गावात दोन सार्वजनिक गणपती उत्सव होत असतात. दहा दिवस दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी करोनामुळे त्यांनी अगदी साधेपणाने उत्सव साजरा केला. यातून वाचलेल्या पैशांतून त्यांनी गजवंताना किटचे वाटप व प्रत्येक घरी सहाशे रुपयांची आर्थिक मदत केली.
रविवारी त्यांनी गाव प्लास्टिकमूक्त मोहिम राबविली. स्वराज एंटरप्राइजेस आणि अवर कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला. गावातील सर्व प्लास्टिक गोळा करण्यात आले. दहा ते बारा गोणी प्लास्टिक जमा केले असून त्यावर पुनप्रक्रिया करण्यात येणार आहे.
मुक्या जनावरांना आधार
या विविध सामाजिक उपक्रमांबरोबर त्यांनी या काळात एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. करोना काळात मुक्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. त्यात भटक्या कुत्र्यांचा अन्नवाचून तडफडून मृत्यू होत आहे. या मुळे गावातील तरुणांनी अवर कम्युनिटी गु्रपच्या माध्यमातून गावात या मुक्या जनावरांसाठी एक संगोपण केंद्र तयार केले आहे. भोर शहरासह ग्रामीण भागात या ग्रुपचे सदस्य या मुक्या जनावरांना गावागाव फिरून अन्न पुरवठा करीत आहेत. यावेळे एखादे जनावर अजारी असल्यास त्याला उचलून गावातील संगोपन केंद्रात आणून त्यावर उपचार केले जात आहेत. बरे झाल्यानंतर त्याला जेथून आणले तेथे सोडून दिले जात आहे.
गावातील सर्वच अबालवृद्धांना समाजकार्याची एक आवड निर्माण झाली आहे. दर महिन्यातून आंम्ही ठरवून एक असा उपक्रम हाती घेत असतो. गावातील तरुण व महिला यात भाग घेत असतात. ज्येष्ठ नागरिकांचा तरुणांना पाठिंबा असल्याने हे शक्य होत आहे. एक आदर्श गाव म्हणून मिळालेल्या गौरवास पात्र ठरण्यासाठी सर्वचजण झटत असतात.
राजेश बोडके, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व
राजगड टाइम्सचे आवाहन
करोनाचा संसर्ग आता गावांपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाने माझे गाव माझी जबाबदारी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. म्हाळवडी गावाप्रमाणे आपल्या तालुक्यातील इतरही अनेक गावे गाव सुरक्षेसाठी प्रयत्न करीत असतील. अपाल्या गावातीही असे काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असतील. राजगड टाइम्सकडे आपण त्या विषयीची माहिती व छायाचित्र पाठवा. rajgadtimesnews@gmail.com .आंम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ.
contcat - rajgadtimesnews@gmail.com
visit - https://www.rajgadtimes.com
facebook - rajgadtimes page like kara
0 Comments