भोर : थोपटे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येतेय का? अशी उत्सुकता भोर, वेल्हा, मुळशीतील जनतेला लाग्ून राहिली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आज आमदार संग्राम थोपटे यांचे चिरंजीव पृथ्वीराज संग्राम थोपटे यांचा वाढदिवस असून समाजमाध्यंमावर या वर्षी पहिल्यांदाच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात भावी आमदार म्हणून अनेक पोस्ट प्रसारित होत आहेत... पण जरा थांबा...पृथ्वीराज शिकतोय अजून अशी बोलकी प्रतिक्रिया खद्द संग्राम थोपटे यांनीच दिली आहे.
पृथ्वीराज संग्राम थोपटे यांचा आज 3 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. समाजमाध्यमांवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच््छांच्या पोस्ट प्रसारित झाल्या आहेत. भोर तालुका कॉंग्रेसच्या फेसबुक पेजवरही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यात आल्या आहेत. तसेच कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाºयांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक पोस्टवर भावी नेतृत्व, भावी आमदार असाही मजकूर आहे. त्यामुळे सहाजिकच थोपटे यांच्या कार्यकत्यांसह विरोधकांनाही पृथ्वीराज राजकारणात येतोय का? असा प्रश्न पडला आहे.
पण जरा थांबा...तो अजून शिक्षण घेत आहे. इजनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे...सध्या त्याचे शिक्षण महत्वाचे आहे. तो शिकतोय...नंतर त्याची आवड व इच््छा पाहून ठरवू अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे. कॉंग्रेसच्या काही पदाधिकाºयांनी तो अजून लहान आहे. असे सांगितले.
पृथ्वीराजला वाढदिवसाच्या राजगड टाइम्सकडून हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा
0 Comments