राजगड टाईम्स भोरकरांच्या हक्काचं ऑनलाइन व्यासपीठ
राजगड टाइम्स हे न्यूजपोर्टल म्हणजे ऑनलाइन बातमीपत्र पुणे जिल्हासाठी आपण सुरू करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची शपथ राजांनी भोर तालुक्यातील रायरेश्वरावर घेतली. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणूनही भोर तालुक्यातील राजगडावरून कारभार केला. भोर हे ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील विद्यामान राज्यातील एक संस्थान. उत्तरेस महादेव डोंगर, पश्चिमेस कुलाबा जिल्हा, दक्षिणेस व पूर्वेस पुणे आणि सातारा यांनी ते सीमांकित होते. यात विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, पौनमावळ व सुधागड हे पाच जिल्ह्याांचा समावेश होता व भोर व शिरवळ ही दोन शहरं व पाचशे दोन खेडी या भोर संस्थानात होती. एवढा मोठा कारभार पंतसचिवांनी भोरच्या राजवाड्यातून पाहिला. 8 मार्च 1948 रोजी भोर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. एवढी मोठी एतिहासिक परंपरा दुसºया कोण्याच्याही वाट्याला आली नाही. ते भाग्य आपल्या भोरकरांना मिळाले आहे. पण आज विकासाच्या नकाशात भोर कुठे आहे ? हा प्रश्न आंम्हाला पडला आहे. या प्रश्नाचेच उत्तर शोधण्यासाठी आंम्ही आमची सुरुवात या भोरच्या ऐतिहासिक पवित्र भुमीतून करीत आहोत. राजगड टाइम्स सजग नागरिक बनून भोरच्या विकासवारीत आपल्या सर्वांच्या पाठबळावर खारीचा वाटा नक्कीच टाकेल. गरज आहे ती भारेकरांच्या पाठिंब्याची.
संपर्क
इ मेल आयडी : rajgadtimesnews@gmail.com
0 Comments